अखेर जयदीप आपटेला अटक; कुटुंबियांनी भेटायला आला अन् पोलिसांनी घेतले ताब्यात

Jaydeep Apate Arrest | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. मागील काही दिवसांपासून पोलिस जयदीप आपटेचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर त्याला बुधवारी रात्री कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
जयदीप आपटेला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसलळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे सापडत नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला जयदीप आपटे अखेर राहत्या घरीच सापडल्याची माहिती समोर आली आहे. Jaydeep Apate Arrest |
कशी केली अटक?
जयदीप आपटे काल रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. सचिन गुंजाळ यांनी सचिन आपटे याला अटक करण्यासाठी दोन पथक तयार केले. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकात होतं तर दुसरे पथक आपटे याचा बिल्डिंग समोर तैनात करण्यात आले होते. आपटे इमारतीच्या परिसरात येताच रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. Jaydeep Apate Arrest |
बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटीलही अटक
दरम्यान, याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व मालवण पोलीस यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर आता फरार आरोपी जयदीप आपटेला अटकही ताब्यात घेण्यात आले आहे. Jaydeep Apate Arrest |
हेही वाचा:
पुणे | ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन





