पुण्यातील ऑक्सिजनवरील करोना बाधितांची संख्याही हजाराजवळ
Updated On:

पुणे – शहरात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येने 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची संख्याही पाचशेच्या वर गेली असून, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्याही साडेनऊशेच्या घरात आहे. काही तासांत ती हजाराच्या वर जाण्याची भीती आहे.
महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील करोनाबाधितांसाठीचे आरक्षित बेड भरत चालले आहेत. त्यामुळे खाटा मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. अशा वेळी महापालिका प्रशासनाची हेल्पलाइन पुन्हा “बिझी’ झाल्याचे चित्र आहे.





