Rain Update: पुढील काही तास महत्त्वाचे! अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
Rain Update: राज्यात 4 ते 7 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

Rain Update: महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने वेग धरला असून, मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पाऊस कायम आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Rain Update)
मुंबईतील पावसाचा जोर पाहता प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क असून महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग किंवा समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Rain Update)
भारतीय हवामान विभागाने, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Update)
महाराष्ट्रात 4 ते 7 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. संभाव्य परिस्थिती पाहता मुंबईतील पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. (Rain Update)
दोन दिवस पुण्यात पावसाचा जोर कायम (Rain Update)
मुंबईसह ठाणे, पुणे घाटमाथा, पालघर, सातारा, रायगड या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार असून घाट परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. Rain Update
हेही वाचा:






