पुढचा जेम्स बॉन्ड बनण्यासाठी 7 जणांची नावे चर्चेत

डॅनिएल क्रेगचा “नो टाईम टू डाय’रिलीज झाला आणि अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद या बॉन्डपटाला मिळायला लागला आहे. गेल्या सहा दशकांपासून जेम्स बॉन्ड हे ब्रिटिश सुपकरकॉपचे पात्र आतापर्यंत अर्ध्या डझन पेक्षा अधिक कलाकारांनी पडद्यावर रंगवले आहे.
अपवाद वगळता या सर्व कलाकारंचा जेम्स बॉन्ड प्रेक्षकांना खूप आवडला आहे. डॅनिएल क्रेगचा जेम्स बॉन्डदेखील प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. “नो टाईम टू डाय’ हा आपला अखेरचा जेम्स बॉन्ड असणार आहे, हे त्याने पूर्वीच जाहीर केले आहे.
त्यामुळे या सिरीजमध्ये तो आता जेम्स बॉन्ड म्हणून दिसणार नाही. आता पुढच्या सिनेमात जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी 7 कलाकारांची नावे चर्चेत आहेत. इद्रिस एल्बा. टॉम हार्डी, हेन्री केविल, गेज जीन पेज, सॅम ह्युगन, लाशना लिंच आणि एमिली ब्लंट या कलाकारांची
नावे चर्चेत आहेत. त्यापैकी लाशना लिंच आणि एमिली ब्लंट या दोघी वगळता बाकी पुरुष मंडळी आहेत. लेडी बॉन्डची कल्पना अस्तित्वात आली तरच या दोघींपैकी एकीचा विचार केला जाऊ शकतो. मात्र एरवी उरलेल्या पाच कलाकारांपैकी एखादा जेम्स बॉन्ड असू शकतो.





