Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताचं गूढ उकलणार; 16 तासांनंतर पहिला Black Box सापडला, नेमकं कारण समजणार

Air India Plane Crash In Ahmedabad : अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणार्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI‑171 च्या (बोईंग 787‑8 ड्रीमलाइनर) भीषण अपघात झाला. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या उपकरणाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असे दोन भाग असतात, जे अपघाताच्या संपूर्ण घटनाचक्राचे विश्लेषण करण्यात महत्त्वाचे ठरतात.
ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीतील विश्लेषण केंद्रात पाठवण्यात आला असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी काम सुरु आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स अद्याप सापडला नसून त्याच शोध सुरु आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घटनास्थळाला भेट देतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच आपली उपस्थिती दर्शवून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना रुग्णालयात भेट दिली.
या भयंकर अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला, ज्यात विमानातील 241 प्रवासी आणि विमानाच्या खाली असलेल्या भागातील 24 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा देखील समावेश आहे. या सर्वांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांची मदत आणि जखमींसाठी उपचार व हॉस्टेल सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
एखाद्या विमानाचा अपघात झाला असेल, तर हा अपघात कसा झाला. या कारणांचा शोध लावण्यासाठी विमानात बसवलेली दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं, तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.
ब्लॅक बॉक्स का महत्त्वाचा?
प्लेन क्रॅशनंतर ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विमान कसं कोसळलं? त्यामागे काय कारण आहेत? हे शोधून काढता येतं. त्यामुळे तो महत्त्वाचा पार्ट आहे. विमान कोसळल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी स्पेशली ट्रेन एअर क्रॅश इन्वेस्टिगेशन टीम तयार केली जाते. ही टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम करते. भारतात नागरी विमान महासंचलानलय आणि एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोकडून ही टीम पाठवली जाते.
दुर्घटनेची चार संभाव्य कारणं?
विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा…
लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो…
पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी…
टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत…
242 प्रवाशांपैकी फक्त एकच प्रवाशी जिवंत
या भीषण अपघातात 242 प्रवाशांपैकी फक्त एकच जण जिवंत आढळला आहे. रमेश विश्वासकुमार अपघातातून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विमान अपघातावेळी नेमके काय घडलं? याची माहिती दिली आहे.
सव्वा लाख लिटर इंधनामुळे कुणालाच वाचवता आले नाही : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. “विमानात सव्वा लाख लिटर इंधन होते. प्रचंड तापमानामुळे कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही,” असे त्यांनी सांगितले. एकमेव प्रवासी, विश्वशकुमार रमेश, सुदैवाने बचावला असून, शाह यांनी त्याला भेट दिली.





