Russian Plane Crash : रशियाचे लढाऊ विमान क्रिमियामध्ये कोसळले
रशियाच्या हवाई दलाचे सुखोई-३० हे लढा विमान आज क्रिमियामध्ये (Russian Plane Crash) कोसळले. प्रशिक्षणाच्या नियमित उड्डाणादरम्यान हे विमान कोसळले असल्याचे माध्यमांनी सांगितले.

Russian Plane Crash : रशियाच्या हवाई दलाचे सुखोई-३० हे लढा विमान आज क्रिमियामध्ये (Russian Plane Crash) कोसळले. प्रशिक्षणाच्या नियमित उड्डाणादरम्यान हे विमान कोसळले असल्याचे माध्यमांनी सांगितले. विमानातील दोन्ही वैमानिकांनी विमान कोसळण्यापुर्वी आपली सुखरुप सुटका करून घेतली होती.
बचाव पथकाने त्यांना शोधून परत आणले असल्याचे रशियाच्या हवाई (Russian Plane Crash) दलाने म्हटले आहे. वैमानिकांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे एका संकेतस्थळाने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. सुखोई-३० हे मल्टिरोल लढाऊ विमान उड्डाणाच्यावेळी कोणत्याही शस्त्रांसह उड्डाण करत नव्हते.
विमानामध्ये कोणताही दारुगोळा देखील नव्हता, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र विमान कोसळण्यामागील नेमके कारण किंवा त्यावेळच्या परिस्थितीबाबत संरक्षण मंत्रालयाने काहीही सांगितले नाही.
दिनांक ३१ मार्चच्या संध्याकाळी क्रिमियामध्ये (Russian Plane Crash) एक एन-२६ लष्करी वाहतूक विमान कोसळले होते. त्यात विमानातील सात कर्मचारी आणि २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हे विमान एका कड्यावर आदळले होते. या अपघाताचे प्राथमिक कारण तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले आहे.






