‘सर्वाधिक बिघडलेली महिला, अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणून…’; कंगना जया बच्चन यांच्यावर संतापली

Kangana Ranaut Troll Jaya Bachchan | बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन त्यांच्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यात त्या सेल्फी घेण्यासाठी पुढे आलेल्या एका चाहत्याला धक्का देताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे जया बच्चन यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. यातच आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनीही जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
लज्जास्पद गोष्ट…
खासदार कंगना राणावतने इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच लिहिले की, “सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला… लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात, कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. ही लज्जास्पद गोष्ट आहे .”
व्हायरल व्हिडीओ दिसते की, जया बच्चन त्यांच्या पक्षाच्या सदस्यांशी बोलत आहेत. अचानक एक माणूस तिथे येतो आणि खिशातून फोन काढून जया बच्चन यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. पण, जया बच्चन त्या माणसाला जोरात ढकलतात आणि म्हणतात की, “तू काय करतोयस?…” नंतर त्या माणसाकडे रागानं पाहत आतमध्ये निघून जातात. Kangana Ranaut Troll Jaya Bachchan |
जया बच्चन ट्रोल
जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. ‘या फेम आणि प्रसिद्धीच्या लायक नाहीत’, ‘आम्हाला खरोखर अमिताभ साहेबांची दया येते’, ‘जर त्यांना सार्वजनिक जीवनात राहायचे असेल तर लोक असे फोटो काढायला येतीलच. पण त्यांचे वर्तन खूपच असभ्य आणि अस्वीकार्य आहे,” त्या खूप अहंकारी महिला आहे,’ अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जया बच्चन यांनी अशा प्रकारचे कृत्य पहिल्यांदाच केलेले नाही. असे त्यांचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. मात्र त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. Kangana Ranaut Troll Jaya Bachchan |
हेही वाचा :





