नवी दिल्ली – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली.
देशासाठी बलिदान देणारे योद्धे नेहमीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असतील, असे सेठ यांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना सांगितले.
संरक्षण राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्सचे ‘भविष्यातील सैनिक’ असे वर्णन केले तसेच ते देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी मजबूत आधारस्तंभ असतील, असे सांगितले.
तुम्ही सामाजिक सेवा आणि समुदाय विकासाचे अनेक उपक्रम घेऊन परिवर्तनाचे शिलेदार म्हणून काम करत आहात. तुम्ही स्वच्छ गंगा – स्वच्छ भारत राष्ट्रीय मोहीम, आंतरराष्ट्रीय योग दिवस यांसारख्या अनेक राष्ट्रीय मोहिमांमध्ये काम केले आहे.
आताही तुम्ही स्वातंत्र्यदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहात, असे ते म्हणाले. संजय सेठ यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या उत्साहाचे आणि मनोबलाचे कौतुक केले आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.