Pro Kabaddi 2024 : दिल्ली-गुजरात लढत बरोबरीत, प्रतीक दहियाची चमकदार कामगिरी…

Pro Kabaddi 2024 (Dabang DelhiKC vs Gujarat Giants) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 65 वा सामना दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 39-39 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात नवीन कुमारने दिल्लीसाठी पुनरागमन केले आणि त्याने 9 गुण घेतले आणि आशू मलिकने 11 गुण घेतले. तर गुजरात जायंट्ससाठी प्रतीक दहियाने जबरदस्त खेळ दाखवला आणि एकट्याने 20 गुण मिळवून संघाला पुढे नेले.
𝐀 𝐓𝐈𝐄, because both teams were too good to lose ⚖️💥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #DabangDelhiKC #GujaratGiants pic.twitter.com/ufaDvTvpzI
— ProKabaddi (@ProKabaddi) November 20, 2024
मध्यंतराला दबंग दिल्ली संघाने 20-17 अशी आघाडी घेतली होती. यामध्ये दबंग दिल्ली संघाने चढाईतून 9 तर पकडीतून 7 गुणांची कमाई केली. गुजरात संघाने पहिल्या सत्रात चढाईतून 10 तर पकडीतून केवळ 3 गुण मिळविले. दुसऱ्या सत्रात गुजरातने 22 तर दिल्ली संघाने 19 गुणांची कमाई केली.
सामन्याला आठ मिनिटे बाकी असताना गुजरात जायंट्सने दबंग दिल्लीला ऑलआऊट केले आणि स्कोअर 31-31 असा बरोबरीत आणला. दबंग दिल्लीच्या बचावफळीने शेवटच्या 10 मिनिटांत खूप चुका केल्या. दिल्लीचा बचाव प्रतीक दहियाला अजिबात रोखू शकला नाही आणि सामन्याची दोन मिनिटे बाकी असताना दिल्ली ऑलआऊटच्या जवळ आली.
Pro Kabaddi 2024 : बेंगळुरू बुल्सचा पटना पायरेट्सविरुद्ध दारूण पराभव….
तथापि, आशूने दोन गुण मिळवून निश्चित पराभव टाळला आणि नंतर दिल्लीने सुपर टॅकल केले. आशू मलिक शेवटची रेड टाकण्यासाठी गेला आणि त्याला टॅकल करण्यात आले पण तोपर्यंत त्याने बोनस गुण घेतला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि सामना बरोबरीत सुटला.





