नवी दिल्ली – तामिळ सुपरस्टार ‘सूर्या’ची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला “जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होतंय.
एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सगळीकडेच या चित्रपटाचा बोलबाला दिसून येत आहे.
Cracking some cases and bursting some truth bombs! 💥
Watch #JaiBhimOnPrime, this Diwali, on Nov 2.@Suriya_offl #Jyotika @tjgnan @prakashraaj @RSeanRoldan @srkathiir @KKadhirr_artdir @philoedit @rajisha_vijayan #Manikandan @jose_lijomol @PoornimaRamasw1 @kabilanchelliah pic.twitter.com/pf8bv1fsjr— amazon prime video IN (@PrimeVideoIN) October 11, 2021
दरम्यान, ‘जय भीम’ चित्रपटात मुख्य भूमिका वठविणारा अभिनेता सूर्यानं चित्रपटावर प्रेम करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहे. या संदर्भातील एक ट्विट सूर्याने केलं आहे.
Dear all, this love for #Jaibhim is overwhelming. I’ve never witnessed this before! Can’t express in words how thankful I am for the trust & reassurance you all have given us. Heartfelt thanks for standing by us ✊🏼
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) November 17, 2021
अभिनेता सूर्या म्हणाला…. ” प्रिय जन हो.. ‘जय भीम’ बद्दलचं हे प्रेम जबरदस्त आहे. मी याआधी कधीच असं पाहिलं नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला दिलेला विश्वास आणि आश्वासनाबद्दल मी आपला किती आभारी आहे, हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!, असं त्यानं ट्विटर करुन आभार मानले आहेत.