सुरु होतोय ‘योग योगेश्वर शंकर महाराजांचा’ जीवन अध्याय; ‘हा’ मराठी अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकेतीून प्रेक्षकांच्या भेटीला येणार मराठमोळा अभिनेता ‘चिन्मय उदगीरकर’ सध्या लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पण त्याला खरी लोकप्रियता दिली ती नांदा सौख्य भरे आणि घाडगे अॅण्ड सून या मालिकेने दिली. त्यानंतर चिन्मय ‘श्यामचे वडील, प्रेमवारी, मेकअप, वाजवुया बँडबाजा’ या सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकला.
चिन्मयला व्यायामाची प्रचंड आवड आहे. शूटींगमधून वेळ काढून व्यायाम करणं खरं तर तारेवरची कसरत. पण कलाकारांना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हे करावंच लागंत. आणि चिन्मय सुद्धा रोज न चुकता व्यायाम आणि ध्यानसाधना करतो. चिन्मय असं मानतो की, माणसाने फिजिकल फिटनेससोबतच मेन्टल फिटनेस सुद्धा तितकाच जोपासला पाहिजे.
दरम्यान, आता हा मराठमोळा आणि फिट अभिनेता लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अनेक मालिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचा उलगडा होत आहे. आणि याच पौराणिक मालिकांच्या यातील आता आणखी एका नवीन मालिकेचा समावेश होणार आहे.
View this post on Instagram
शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य सांगणारी ‘योग योगेश्वर शंकर महाराज’ ही नवीन मालिका आता प्रेक्षसकांच्या भेटीला येणार असून, नुकतंच या मालिकेचा ऑफिशल प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेविषयी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ‘योग योगेश्वर शंकर महाराज’ या मालिकेत अभिनेता ‘चिन्मय उदगीरकर’ शंकर महाराज यांची भूमिका साकारणार आहे.






