मुलगी झाल्याचा आनंद, वडिल बनले धुरंधर! अक्षय खन्नाच्या हूक स्टेप्सवर भन्नाट डान्स; यामी गौतमने शेअर केला व्हिडीओ

Yami Gautam : सध्या ‘धुरंदर’ चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाच्या हुक स्टेप्स असलेले गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर रील्स तयार केल्या जात असून त्या तुफान व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडियावर या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी अभिनेत्री यामी गौतम हिने शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे.
Winner Of The Trend ❤️🔥 pic.twitter.com/7kvPDO03IM
— POSITIVE FAN (@imashishsrrk) December 17, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत मुलगी झाल्याच्या आनंदात रुग्णालयात एक वडिल या चित्रपटातील गाण्यावर थिरकले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी व्हिडीओला पसंती दर्शवत आहेत. हाच व्हिडीओ दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी अभिनेत्री यामी गौतमने शेअर केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने ” Hands down, winner” म्हणजेच “निःसंशय, हाच खरा विजेता. विनर ऑफ द ट्रेंड”. असे आकर्षक कॅप्शन दिले आहे. व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून नेटकरी कमेंट करत वडिलांचे अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा : बांगलादेशमध्ये पुन्हा अशांतता! कोण आहे शरीफ उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर पसरली संतापाची लाट





