कडाक्याच्या थंडीतही जवानांनी साजरा केला ख्रिसमस

नवी दिल्ली – ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत विविध भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच ख्रिसमस हा सण ख्रिस्त बांधवांचा असला, तरी सर्वच धर्मीय उत्साहाने हा सण साजरा करतात.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील देशभरात नाताळाचा उत्साह आहे. ख्रिसमसचा हाच उत्साह सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्या जवानांमध्येही दिसत आहे. नियंत्रण रेषेजवळ बर्फाच्छादित प्रदेशामध्येही सर्व जवान आनंदाने ख्रिसमस साजरा करत आहे. तसेच ‘जिंगल बेल्स जिंगल बेल्स’ हे गाणे गुणगुणताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ‘स्नो मॅन’ आणि सांताक्लॉजही दिसत आहे. काश्मीरच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवानांचा हा उत्साह वाखाखण्याजोगा आहे.
#WATCH Jawans celebrate Christmas on the Line of Control in Kashmir. (Source – Indian Army) pic.twitter.com/3Msg6s82iO
— ANI (@ANI) December 25, 2019




