मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजला तिसर्या तिमाहीत 16,645 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 18,540 कोटी रुपयांचा नफा झाला होता. रिटेल विभागातील कमी झालेली उलाढाल आणि वायू उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे या तिमाहीत कंपनीचा नफा वाढू शकला नाही. ताळेबंदाबद्दल विश्लेषकांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी दर कपात झाल्यानंतर या कंपनीच्या रिटेल व्यवहारावरील नफा कमी झाला. त्या कंपनीच्या जिओ प्लॅटफॉर्म विभागाचा नफा तेरा टक्क्यांनी वाढला असल्याचे कंपनीने नमूद केले. तर तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा महसूल 8.4 टक्क्यांनी वाढला आहे. जीयो या मोबाइल कंपनीचा महसूल वाढून 2.69 लाख कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 2.43 लाख कोटी होती. कंपनीचा करपूपर्व नफा 6.1 टक्क्यांनी वाढून 48,003 कोटी रुपये झाला आहे. या निकालाबाबत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, परदेशातील परिस्थिती बरेच खराब असतानाही कंपनीच्या महसुलावर फारसा परिणाम झालेला नाही. मोबाईल क्षेत्रातील रिलायन्स जिओ कंपनीच्या ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच या क्षेत्रातून नफाही वाढत असल्याचे सांगण्यात आले.