गणेशभक्तांवर विघ्न! मूर्तीकार पळून गेल्याने पंचाईत; दिसेल ती मूर्ती घेऊन जाऊ लागले लोक….

Dombivali News | गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरात मोठी तयारी करण्यात आली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने अनेक ठिकाणी तयारीने वेग घेतला आहे. काहींनी बुक केलेल्या मूर्ती घरी आणण्यास सुरुवात केली, असे असतानाच कल्याण-डोंबिवलीतून एक घटना समोर आली आहे. डोंबिवली वेस्ट परिसरातील एका कलाकेंद्रातील मूर्तीकारच पळून गेल्याने येथील नागरिकांची पंचाईत झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली वेस्टमधील फुले रोडवरील ‘आनंदी कला’ केंद्राचा मूर्तिकार गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर पळून गेला आहे. ऐनवेळी मूर्तीकार पळून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उद्या गणपतीचे आगमन होणार आहे. आता आयत्यावेळी गणपतीची मूर्ती कुठून आणायची? असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
दोन-तीन महिन्यांपासून केलेल्या बुकिंगचे पैसे तर वाया गेले, शिवाय ऐनवेळी मूर्तीही हाती नाही, म्हणून गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला. याशिवाय या मूर्तीकाराचा फोनही बंद असल्याने नागरिकांनी निराशा व्यक्त केली आहे. Dombivali News |
गणेश भक्तांवर संकट
आनंदी कला केंद्राच्या मालकाने मोठ्या प्रमाणावर गणपतींचे बुकिंग घेतले होते. मात्र, मूर्तीकार आणि कारागीर पळून गेल्याची बातमी परिसरात पसरल्यानंतर अनेक नागरिक याठिकाणी आले. अनेक जण आपली गैरसोय टाळण्यासाठी कलाकेंद्रात दिसेल ती मूर्ती घरी घेऊन जात आहे. त्यामुळे ऐन गणपती बाप्पाच्या आगामनापूर्वीच गणेश भक्तांवर संकट ओढवले आहे. Dombivali News |
दरम्यान, सकाळी सात वाजता पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारखाना बंद केला आणि पळून गेलेल्या मूर्तिकाराचा शोध सुरु केला.
हेही वाचा:





