सोनाली कुलकर्णीचा यंदाचा गणेशोत्सव असणार भावनिक; मूर्तीही असणार खास

मुंबई – येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र रेलचेल सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगामनासाठी बच्चे कंपनीपासून तरुण वर्गामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सोनालीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
सोनालीने यंदा देखील पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती घरी तयार केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती घरी मूर्ती घडवत आहे. याबाबत तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर माहिती दिली आहे. यात तिने आजी- आजोबांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. ती म्हणाली की, ” माझ्या आजीने जगाचा निरोप घेतल्याने मागील वर्षी आमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले नाही. त्यामुळे यंदाचा गणपती खास असणार आहे.” यावेळी तिने खास मूर्ती घडवली आहे. सोनालीने तिचे जन्मस्थळ असलेला देहू गावातील मातीत मंजुळा मिक्स केल्या आहेत. जेणेकरून गणपती विसर्जनानंतर यातून तुळशीचे सुंदर रोप येईल.
यंदा गणेशोत्सव खूप भावनिक आहे आणि
यंदा ची मूर्ती खूप खास आहे …
का आणि कोणती …?ते पाहण्यासाठी SUBSCRIBE करा
माझ्या YOU TUBE चैनल ला. https://t.co/u7d1vi65zF#sonaleekulkarni YouTube #youtube @YouTube @YouTubeIndia pic.twitter.com/RrWql3VVlW— सोनाली (@meSonalee) September 16, 2023
याबाबत तिने एक ट्वीटवर (एक्स) फोटो शेअर करत “यंदा गणेशोत्सव खूप भावनिक आहे आणि यंदाची मूर्ती खूप खास आहे,” असे म्हंटले आहे. कारण सोनालीचा यंदाचा बाप्पा जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या रुपातील आहे. याशिवाय यंदा ती पहिल्यांदाच तिच्या आजी शिवाय गणेशोत्सव साजरा करत असल्याने ती भावनिकही झाली. दरम्यान, गणेशाची मूर्ती नेमकी कशापद्धतीने तिने साकारले आहे. याचा व्हिडिओ आणि फोटो तिने शेअर केला आहे.





