Pune District : ‘त्या’ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार
Updated On:

नायगाव : पुरदंर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजना राबविणे करिता लाभार्थ्यांचे बँक खात्यात डीबीटीद्वारे अनुदान जमा होणार आहे.
ज्या लाभार्थी यांनी अद्यापपर्यंत आधारकार्ड अद्यावत व बँकेशी संलग्न केलेले नाहीत आशा लाभार्थी यांनी आधार कार्ड अद्यावत करुन बँकेशी संलग्न करुन घ्यावी.
त्यानंतर आधार कार्डची छायांकीत प्रत, बँक पासबुकची छायांकीत प्रत व मोबाइल क्रमांक नमुद करुन संबधित ग्राम महमूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडेे तात्काळ द्यावी, असे आवाहन पुरंदर येथील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार महादेव जाधव यांनी केले आहे.





