Sanjay Raut : “कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आले…”; राऊतांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Raut : संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे सरकार देवळात बळी देऊनच आले आहे, असा खळबळजनक दावा केला.

Sanjay Raut : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत जोरदार प्रहार केला आहे.
कुर्बानीच्या मुद्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेतील सात नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र लिहित बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवतात. अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा : Mint Benefits: उन्हाळ्यात पुदिना ठरतो आरोग्याचा खजिना; शरीराला देतो थंडावा आणि ताजेपणा
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? (Sanjay Raut)
आता महाराष्ट्रात वडापाव सोबत मत्स्य पाव येणार आहे. हे नवीन-नवीन फंडे काढत असतात. पण खिमा पाव खायचा नाही. कारण त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे. काल या राज्यात मुस्लिमांच्या सणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवतात. अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका. महाराष्ट्र हा मांसाहारी आहे. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचे पालन करणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादत आहात? महाराष्ट्राची दिशा अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे.
राऊतांचा खळबळजनक दावा (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे सरकार देवळात बळी देऊनच आले आहे, असा खळबळजनक दावा केला. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आले आहे ते सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत. हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात मांसाहार होणारच आहे. जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत, त्यांच्यासोबत आपण बसलेला आहात. त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली. या वादावर गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बसून तोडगा काढायला हवा होता, असे ते म्हणाले.
आयुक्तांना पत्र
भाजपच्या सात आमदारांसह अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायटी, रहिवासी संकुल आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. सोसायटीत कुर्बानीमुळे इतर धर्मीयांना त्रास होऊ शकतो, असा दावा पत्रात करण्यात आला होता.






