Devendra Fadnavis : फडणवीस केंद्रात गेले तर, कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? बड्या नेत्याने थेट नावाचं सांगितलं…
Devendra Fadnavis : राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, याकरिता काही नावांची चर्चा सुरू होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. (Devendra Fadnavis)
‘बावनकुळे यांची शिफारस स्वत: फडणवीसचं करतील’ (Devendra Fadnavis)
तसेच एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांची शिफारस स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
“मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील. जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे,” असे संजय राऊत यांनी म्हंटले. दरम्यान, सध्या संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis )
हेही वाचा :






