Mahayuti Mahamandal Distribution : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! राज्यातील महामंडळ जागावाटपाबाबत सूत्र निश्चित, कोणाच्या वाट्याला किती जागा ?
Mahayuti Mahamandal Distribution : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळ वाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

Mahayuti Mahamandal Distribution : राज्यातील महायुती सरकारकडून बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून विविध महामंडळांवरील नियुक्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळ वाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील महिनाभरात राज्यातील विविध महामंडळांचे जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. महायुतीत यासाठी प्राथमिक फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला असून त्यानुसार भाजपला 48 टक्के, शिवसेनाला 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 20 टक्के महामंडळे देण्याचे सूत्र ठरल्याची चर्चा आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणते महामंडळ जाणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Mahayuti Mahamandal Distribution)

Mahayuti Mahamandal Distribution : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! राज्यातील महामंडळ जागावाटपाबाबत सूत्र निश्चित, कोणाच्या वाट्याला किती जागा ?
इच्छुकांकडून लॅाबिंग सुरू (Mahayuti Mahamandal Distribution)
महायुतीच्या आगामी बैठकीत महामंडळातील सदस्य आणि पदांचे वाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्या गटातील कोणाला कोणत्या महामंडळावर संधी द्यायची, याचा निर्णय घेतील. त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच लॉबिंग आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. (Mahayuti Mahamandal Distribution)
दरम्यान, राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 16 जागांसाठी निवडणूक होणार असून 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एका जागेवर पोटनिवडणूक असल्याने एकूण 17 जागांसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी करणार यावर महायुतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
जर निवडणूक बिनविरोध झाली तर धामधूम संपेल; मात्र मतदान झाल्यास 22 जूनपर्यंत राज्यात राजकीय चुरस आणि डावपेच रंगण्याची शक्यता आहे. त्यानंतर महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अधिक वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी काही दिवसांत महायुतीतील सत्ता समीकरणे आणि महामंडळांवरील नियुक्त्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Rohit Pawar : ‘खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी’; रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ





