‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे नवं पोस्टर आलं समोर

Navara Maza Navsacha 2 | अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर तब्बल 19 वर्षाने या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते फारच उत्सुक आहेत. यातच आता या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वाद घेऊन दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.
View this post on Instagram
सचिन पिळगांवकर यांनी हे पोस्टर शेअर करत लिहिले की, “गणपतीपुळ्याच्या नॉनस्टॉप कॉमेडीच्या प्रवासाचे प्रवासी confirmed झालेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाचं थेट पोस्टर घेऊन आलेत. २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”
दरम्यान, 2004 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागात गणपतीपुळ्याचा प्रवास सर्वांनी एसटीने केला होता. या सिनेमातील अभिनेते अशोक सराफ यांनी ‘लालू कंडक्टर’ची भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्याही भलतीच पसंतीस उतरली होती. आता या भागात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर त्यांच्या प्रवाशांसह हा प्रवास रेल्वेने करणार असून अशोक सराफ हे टीसीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा:





