सहा महिन्यात सिनेमा पूर्ण; 10 लाखांच्या बजेटमध्ये पुजाऱ्याने बनवला ‘AI’ चित्रपट

AI Feature Film | आजकाल सर्वच क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे. याचदरम्यान आता एका कन्नड चित्रपटासाठी AI चा वापर करण्यात आला आहे. बंगळुरूजवळच्या सिद्धेहल्ली गावातील नरसिंह मूर्ती नावाच्या एका पुजाऱ्यानं फक्त 10 लाख रुपये खर्च करून आणि 6 महिने कठोर परिश्रम करून एक अनोखा चित्रपट बनवला आहे.
‘LOVE YOU’ हा चित्रपट सहा महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी 30 वेगवेगळ्या एआय टूल्सचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बजेट केवळ 10 लाख रुपये आहे. ज्यापैकी बहुतेक भाग सॉफ्टवेअर परवान्यासाठी खर्च करण्यात आला.
अभिनेता नाही, संगीत दिग्दर्शक नाही
95 मिनिटांच्या या कन्नड चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सुद्धा मिळालं आहे. यात 12 गाण्याचा सामावेश आहे. चित्रपटात कोणताही अभिनेता नाही, संगीत दिग्दर्शक नाही आणि कोणताही प्रोडक्शन हाऊसचा क्रू मेंबरही नाही. नरसिंह मूर्ती यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआय वापरून सर्व काही केलं आहे.
या चित्रपटात कोणताही कलाकार नाही. या चित्रपटातील फ्रेम्स, गाणे, डायलॉग्स लिपसिंग सगळं काही AI च्या मदतीने करण्यात आलं आहे. या प्रोजेक्टमध्ये AI इंजीनियर नूतन यांनी कोडिंग भाग सांभाळला. तर सुंदर राज गुंडू यांनी चित्रपटातील क्रिएटिव्हवर काम केले आहे. चित्रपटाचे डायरेक्टर नरसिंहमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट एका नव्या टॅक्नोलॉजीची परिभाषा आहे. चित्रपटाच्या बजेटचा मोठा भाग एआय सॉफ्टवेअर परवान्यासाठी खर्च झाला आहे. लवकरच हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
सैफुल्लाहच्या आदेशावरूनच ‘या’ पाच दहशतवाद्यांकडून हल्ला ; पहलगाम हल्ल्यात ‘पाक कनेक्शन’, वाचा सावितर





