सैफुल्लाहच्या आदेशावरूनच ‘या’ पाच दहशतवाद्यांकडून हल्ला ; पहलगाम हल्ल्यात ‘पाक कनेक्शन’, वाचा सावितर

Pahalgam Terror Attack । पहलगाम हल्ल्यापासून भारतीय लष्कराचे जवान सक्रिय आहेत. दरम्यान, एक गुप्तचर अहवाल समोर आला आहे. पहलगाम हल्ल्याची योजना लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी यानेच आखली होती. या हल्ल्याबाबत फेब्रुवारीमध्ये एक बैठक झाली. सैफुल्लाहने हल्ल्यासाठी पाच दहशतवाद्यांना तयार केले. यानंतर, मार्चमध्ये सर्व दहशतवादी पुन्हा भेटले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन या अहवालातून समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्याची योजना फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. लष्कराचे उपप्रमुख सैफुल्लाह यांच्या आदेशानंतर नियोजन सुरू झाले. दहशतवाद्यांची पहिली बैठक फेब्रुवारीमध्येच झाली होती. यानंतर, दहशतवाद्यांची पुढची बैठक मार्चमध्ये मीरपूरमध्ये झाली. सर्व दहशतवादी यात सहभागी होते. या बैठकीत पहलगामबाबत एक योजना आखण्यात आली. पाकिस्तानी सैन्यानेही दहशतवाद्यांना मदत केली. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे.
पहलगाम हल्ल्याचा कट कसा रचला गेला? Pahalgam Terror Attack ।
लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह याने पाच दहशतवाद्यांसह बैठक घेतली. यानंतर मीरपूरमध्ये हल्ल्याची योजना आखण्यात आली. अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिद यांनी सैफुल्लासोबत बैठकीला हजेरी लावली. सैफुल्लाला आयएसआयकडून आदेश मिळाले होते.
पहलगाम हल्ल्याचे पाक कनेक्शन Pahalgam Terror Attack ।
लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह पाकिस्तानी लष्कराच्या छावणीत पोहोचला होता. बहावलपूर येथील मुख्यालयात पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने दहशतवादी सैफुल्लाहचे स्वागत केले. त्याचे फोटोही समोर आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते १८ एप्रिल रोजी रावळकोट येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सैफुल्लाहसोबत पाचही दहशतवादी दिसले. तो प्रक्षोभक विधाने करताना दिसला.





