‘काहे दिया परदेस’ मालिकेतील जोडी पुन्हा एकत्र; ‘समसारा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Sayali Sanjeev- Rishi Saxena | झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. यातील सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. आता ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांचा ‘समसारा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘समसारा’ चित्रपट 20 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीजर पोस्टर लाँच करण्यात आला आहे.
‘समसारा’ चित्रपटाच्या पोस्टरला एक हटके कॅप्शन देत लिहिलं की, “कोण देव कोण दानव, ओळखता येईल का कोण मानव? धोक्याचा वणवा पेटतोय, काळ स्वतः जागा होतोय, आम्ही येतोय. समसारा: द वूम्ब.”
View this post on Instagram
या पोस्टरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते ऋषी सक्सेना आणि सायली संजीव जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. यात सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. Sayali Sanjeev- Rishi Saxena |
‘काहे दिया परदेस’नंतर ‘समसारा’ हा पहिला मोठा प्रोजेक्ट आहे, ज्यात ऋषी सक्सेना आणि सायली संजीव एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनीही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते. Sayali Sanjeev- Rishi Saxena |
हेही वाचा:
निशिकांत दुबेंच्या अवमान प्रकरणात न्यायालयाचा इशारा ; “केस दाखल करा, पण…”





