Actress Sayali Sanjeev : झी मराठी वाहिनीवरील काही दिया परदेस ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव हिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या मालिकेमुळे ती घराघरात पोहचले. तिला मोठी प्रसिद्ध मिळवून देण्यात या मालिकाचा मोठा हात आहे, म्हटले तर वागगे वाटू नये. या मालिकेनंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, सध्या सायली तिने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे चर्चेत आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री सायली संजीव हिने सक्रिय राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलाखतीदरम्यान सायलीला ती राजकारणात एन्ट्री करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, मला सक्रीय राजकारणात सहभागी होऊन काम करायचं आहे. मी जेव्हा राजकारणात येईन तेव्हा काही गोष्टी कदाचित बदललेल्या असतील. त्यामुळे मला आज ज्या समस्या आहेत त्याकडे बघून मी माझं तेव्हाचं ध्येय ठरवलं, तर त्याचा आता काय फायदा होणार नाही. तेव्हा त्याचा तसा संबंध नसेल, असे ती म्हणाली आहे. ….तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत अभिनेत्रीने केलेल्या या विधानामुळे ती राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सायली संजीवने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. छान रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, स्वच्छता हवी, प्लॅस्टिक नको हे सगळं करण्यासाठी काय मेहनत लागते हे आपणही बघितलं पाहिजे. म्हणजे फक्त व्यवस्थेला शासनाला नाव ठेवण्यापेक्षा त्यात उतरून काय काय करावं लागतं हे बघितलं पाहिजे, आपण जोपर्यंत ते काम करून बघत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत, असे मत तिने व्यक्त केले आहे. हेही वाचा : तारीख पे तारीख…! शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले ; नेमकं कारण काय ? वाचा