“बाबा, थांब ना रे तू, जाऊ नको दूर…” सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक

Sayali Sanjeev Post | अभिनेत्री सायली संजीव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची ‘काहे दिया परदेस’ ही मालिका विशेष गाजली. या मालिकेच्या माध्यमातून सायली घराघरात पोहोचली. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर सायलीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय ती सोशल मिडियावर देखील सक्रिय असते. नुकतेच तिने वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सायली संजीवच्या वडिलांचे ३० नोव्हेंबर २०२१ रोजी कर्करोगाने निधन झाले होते. वडिलांच्या आठवणीत सायलीने पुन्हा जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने “बाबा, थांब ना रे तू, जाऊ नको दूर…” हे गाणं जोडलं. सायलीची ही भावनिक पोस्ट पाहून चाहत्यांनीही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. Sayali Sanjeev Post |
View this post on Instagram
सायली संजीवच्या वडिलांचे नाव संजीव चांदसरकर होते. ते नाशिकमधील तहसीलदार होते. सायलीच्या नावातील संजीव हे आडनाव नसून तिच्या वडीलांचे नाव आहे. वडिलांवरील प्रेमासाठी सायलीने खास टॅटूही काढला आहे. Sayali Sanjeev Post |
सायलीच्या कामाबद्दल सांगायचे तर ती ‘काहे दिया परदेस’ नंतर ‘परफेक्ट पती’ या हिंदी मालिकेतही झळकली होती. याशिवाय, तिने ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘हर हर महादेव’, ‘सातारचा सलमान’, ‘फुलराणी’, ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलिकडेच ती ‘समसारा’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत होता. Sayali Sanjeev Post |
हेही वाचा:
दीपिका पादुकोणची बहीण अडकणार विवाहबंधनात? देओल कुटूंबासोबत आहे खास कनेक्शन





