UBT Shivsena : चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यातला वाद मिटला;उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मोठा निर्णय

Chandrakant Khaire | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. एकीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही, तर दुसरीकडे पक्षांतर्गत कुरघोडी होत असून, नेते एकमेकांबाबत उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे ठाकरे गटात सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या सर्व घडामोडीनंतर अंबादास दानवेंची तक्रार करण्यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अंबादास दानवे यांच्यासोबत असलेला वाद मिटला असून आम्ही एकत्र काम करणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Ambadas Danve |
आमचा वाद केव्हाच मिटला : चंद्रकांत खैरे
पुढे बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट झाली. काही कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत. त्याबाबत त्यांच्याशी बोलणे देखील झाले आहे. अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत, तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाहीत, सोबत म्हणून कार्यक्रम करणार आहोत.
सेना भवनला एक बैठक असेल, मी आणि अंबादास दानवे सोबत बैठकीला असणार आहोत, असं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. दरम्यान, १५ जूनला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. शिवसेना भवनचे उद्घाटन आहे, याशिवाय शिबिर घेतील. आदित्य ठाकरेही येणार असल्याची माहिती खैरे यांनी दिली. Chandrakant Khaire |
खैरे, दानवे यांच्यातला वाद काय?
लोकसभा निवडणुकीनंतर संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला होता. शहरातील पाणीबाणीविरोधात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. माझ्याकडे विचारणा केली जात नाही. वारंवार असे होते.
याबाबत मी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पक्षाच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच अंबादास मागून आला आणि काड्या करतो, इथे शिवसेना मी वाढवली, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली होती. Chandrakant Khaire and Ambadas Danve





