पंख्याला लटकलेला कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

Kannada film director Guru Prasad Found Dead | प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद बंगळुरू येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्याने दोन-तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गुरुप्रसाद मागील आठ महिन्यांपासून उत्तर बंगळुरूमधील मदननायकनहल्ली भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. शेजाऱ्यांना त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गुरुप्रसादचे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच त्याचा ‘रंगनायक’ चित्रपटही फ्लॉप ठरल्याने तो नैराश्यात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुप्रसादचा फ्लॅटमधील पंख्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Kannada film director Guru Prasad Found Dead |
गुरुप्रसाद यांनी २००६ मध्ये ‘माता’ चित्रपटातून त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. यानंतर ‘एडेलू मंजुनाथ’ या चित्रपटाचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले. या दोन्ही सिनेमांसाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. याशिवाय गुरुप्रसाद रिॲलिटी टीव्ही शो ‘डान्स कर्नाटक डान्स’चा परिक्षक होता. त्याने ‘बिग बॉस कन्नड २’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. Kannada film director Guru Prasad Found Dead |
हेही वाचा:
आता काय म्हणावं??? जरांगेंचे समर्थन मिळवण्यासाठी चक्क अपक्ष उमेदवाराने स्वत:ची कार जाळली





