#कोरोना- किराणा झाला, भाजी झाली आता गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
Updated On:

पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लोकांच घराबाहेर पडणं थांबत नाही आहे. त्यातच गंज पेठ आणि घसेटी पूल या भागात गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस घरी थांबण्यासाठी संचारबंदी केली आहे. मात्र लोक 21 दिवस लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडताना आढळत आहे.
दरम्यान, 21 दिवस संचारबंदी असली तरीही अत्यावश्यक वस्तुंची किंवा जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील असंही जाहीर केलं होतं. मात्र नागरिक शासनाच्या सुचनेचं पालन करताना दिसत नाही आहे.





