साऊथ स्टार्सचा वाद शिगेला ! नयनताराच्या ‘त्या’ पत्रावर धनुषची संतप्त प्रतिक्रिया; दिला 24 तासांचा अल्टीमेटम, ‘फुटेज काढलं नाही तर…’

Dhanush | Nayanthara : बादशाह आणि कपिल शर्मानंतर आता दोन दाक्षिणात्य स्टार्समध्ये कायदेशीर नोटीसचे युद्ध सुरू झाले आहे. हे दोन्ही स्टार्स साऊथचे मोठे चेहरे आहेत. ‘नयनतारा आणि धनुष’. नयनताराचा ‘नयनथारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ ही डॉक्युमेंटरी नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
या डॉक्युमेंटरीमध्ये धनुषचे ‘नानुम राउडी धन’ हे गाणे 3 सेकंद वापरले गेले आहे. या गाण्याचा निर्माता धनुष आहे. हे गाणे वापरल्याबद्दल धनुषने अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यावर नयनताराने आपला संताप व्यक्त करत धनुषवर टीका करणारे वक्तव्य जारी केले आहे.
धनुषने नयनताराला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानंतर नयनतारा संतापली आणि तिने धनुषचा पर्दाफाश केला. नयनताराने सोशल मीडियावर अनेक पेजेसचे स्टेटमेंट जारी केले आहे. ज्यात तिने अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर दिले. रजनीकांत यांच्याशिवाय अनेक दिग्दर्शकांनी या प्रकरणी नयनताराला पाठिंबा दिला आहे.
अभिनेत्रीने लिहिले, ‘तुमच्या एनओसीसाठी 2 वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि आमच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीच्या रिलीजसाठी तुमच्या मंजुरीची वाट पाहिल्यानंतर, आम्ही सध्याच्या आवृत्तीचे संपादन केले आणि त्याग केला.
कारण अनेक विनंत्या करूनही तुम्ही नानम राऊडी धानची गाणी किंवा सीन कट किंवा फोटो वापरण्याची परवानगी नाकारली होती. माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित केलेली दृश्ये फोनवर चित्रित करण्यात आली असून याला तुमचा काही आक्षेप नसावा. असं अभिनेत्री म्हणाली आहे.
View this post on Instagram
मात्र, आता धनुषने नयनताराच्या या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्यानं आपल्या वकिलांमार्फत अभिनेत्री नयनताराला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “तुमच्या क्लायंटने ‘नयनतारा बियाँड द फेरीटेल’ नावाच्या माहितीपटात माझ्या क्लायंटच्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील कंटेट वापरून कॉपीराइट्सचं उल्लंघन केलंय.
View this post on Instagram
तो कंटेट 24 तासांच्या आत काढून टाकण्याचा सल्ला त्यांना द्या. अन्यथा माझा क्लायंट त्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल. त्यात केवळ तुमच्या क्यायंडकडून आणि नेटफ्लिक्स इंडियाकडून 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, याचाच समावेश नसेल,” असा इशारा धनुषच्या वकिलांकडून देण्यात आला आहे.
माझा क्लायंट हा चित्रपटाचा निर्माता आहे आणि चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रत्येक पैसा कुठे खर्च केला आहे याची त्यांनी सविस्तर माहिती आहे. तुमच्या क्लायंटने असं म्हटलंय की माझ्या क्लायंटने पडद्यामागील फुटेज शूट करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला नियुक्त केलं नाही आणि ते विधान निराधार आहे. तुमच्या क्लायंटने त्याचा कडक पुरावा दिला आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.





