कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती
Updated On:

नवी दिल्ली :- कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अजय माकन यांची रविवारी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. दरम्यान, पवनकुमार बन्सल यांना पदावरून अचानक हटविण्यात आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
के सी वेणुगोपाल म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अजय माकन यांची अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या कोषाध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. माकन हे राहुल गांधींचे जवळचे विश्वासू मानले जातात. काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या प्रभारी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यापासून ते कोणत्याही पदावर नव्हते.
दरम्यान, अहमद पटेल यांच्या निधनानंतर बन्सल यांची हंगामी कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते जवळपास तीन वर्षे होते.





