पुण्यातील पुलाखाली उभारलेल्या उद्यानाची दुरवस्था…
Updated On:

पुणे ः सेव्हन लव्हज चौक पुलाखाली उभारलेल्या राजमाता जिजाऊ यांच्यानावे उद्यान उभारण्यात आले होते. पण, आता त्याची दुरवस्था झाली असून, शोभेची झाडे करपली आहेत. येथील ब्लॉक उखडले आहेत.
येथे मद्याच्या बाटल्या पडल्या असून, प्रवेशद्वारावरच ब्लॅंकेट, अस्वचछ कपडे पडलेले आहेत. वेळच्यावेळी देखभाल न केल्याने उद्यान चार ते पाच वर्षांतच बकाल झाले असून पुणेकरांच्या कररुपी पैशांची केलेली ही नासाडीच आहे.

आता महापालिकेने या उद्यानावर खर्च केला, तरी देखभाल-दुरुस्तीसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. (छायाचित्रे ः संदीप घोडके)





