पुणे – राज्यात कॉंग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना विरोधी पक्ष नेता ठरविता येत नाही, त्यासाठी ब्लड टेस्ट करतील. त्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे कॉंग्रेसने विरोधीपक्ष नेमला, तर तो लगेच महायुतीत येईल. त्यामुळेच विरोधी पक्षनेता नेमला जात नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मंगळवारी पुण्यात केली.
बावनकुळे म्हणाले, “कॉंग्रेसमध्ये केव्हाही स्फोट होऊ शकतो, असे सांगत कॉंग्रेसचे आमदार महायुतीत येण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले. तसेच कॉंग्रेसचे कोणीही आमच्याकडे येण्यास तयार असल्यास त्यांच्यासाठी आमचा दुप्पटा तयार असेल. आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली नाही. मात्र, त्यांनी नागपुरात भाषण करताना आमच्या नेत्यांवर व्यक्तीगत टीका केली. त्यांच्या पक्षाची अवस्था पाहता त्यांची ही स्थिती होणे स्वाभाविक आहे. भ्रष्टाचार केला असेल तर बाहेर काढावा. मात्र, आमच्यावर व्यक्तीगत टीका केली तर शांतही बसणार नाही.”