अर्थमंत्र्यांनी यंदा नेसलेल्या साडीच्या रंगाचाही आहे वेगळा ‘अर्थ’; जाणून घ्या आजपर्यंतच्या साड्यांचे वैशिष्टय

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदा मोदी सरकारचे दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचे अर्थसंकल्प असणार आहे. 2024 च्या निवडणुकीआधी सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीचा विषय चर्चिला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची हॅण्डलूमची साडी नेसली आहे. त्यांच्या या लाल रंगाच्या साडीचे गोल्डन आणि काळ्या रंगाचे काठ आहेत. दरम्यान, प्रत्येक वर्षी त्यांची साडी चर्चेत असते. पाहुयात आजपर्यंतच्या साड्यांचे रंग आणि त्यांची खासियत…

* २०१९ साली त्यांनी गुलाबी मंगलगिरी सिल्क ज्याला सोन्यासारख्या पिवळसर तांबूस रंगाचे काठ होते अशी साडी नेसली होती. त्यांनी ही परंपरा सोडून ब्रीफकेसऐवजी अर्थसंकल्पीय पेपर गुंडाळण्यासाठी पारंपरिक ‘बही खात्याचा’ पर्याय निवडला.

* 2020 मध्ये त्यांनी अर्थमंत्र्यांनी निळ्या रंगाचे काठ असलेली पिवशळी साडी नेसली होती. त्यावर त्याच रंगाचा ब्लाउज देखील होता. पिवळसर-गोल्ड सिल्क साडी निवडली. समृध्दी आणि विपुलतेचे द्योतक म्हणून हा रंग ओळखला जातो. बिनधास्त वेशभूषा ही वर्षाच्या ‘महत्त्वाकांक्षी भारत’ या संकल्पनेला अनुसरून होती.
* 2021 मध्ये सीतारामन यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची रेशमी पोचमपल्ली साडी नेसली होती. ज्यात पदराभोवती इकत पॅटर्न होता, त्याचे काठ हिरवे होते. याला मॅचिंग रेड ब्लाऊज त्यांनी परिधान केला होता. भारताचे रेशीम शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेलगाणातील शहरातून ही साडी खास मागवण्यात आली होती.

* 2022 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सीमेवर चंदेरी धाग्याचे काम असलेली मरून रंगाचे हातमाग बोमकाई विणले होते. बोमकाई सामान्यत: ओडिशामध्ये बनवली जाते. मातीचा रंग आणि डिझाइन हे मंत्र्यांनी साधेपणावर आणि पायाभूत असण्यावर भर असल्याचं दाखवण्यासाठी अशा रंगाच्या साडीची निवड केली होती.

* 2023 ची आताची साडी ही लाल रंगाची आहे. त्याला काळ्या रंगाचे सुंदर काठ आहेत. त्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाचं सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. ही साडी देखील हातमागावरची असल्याचं सांगितलं जात आहे. लाल रंग प्रेम, कोध, शौर्य, विजय आणि संघर्षाचं प्रतीक मानला जातो.




