Ajay Devgan । अभिनेता अजय देवगण वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘शैतान’ ‘मैदान’ प्रेक्षकांच्या भेटीला आले तर ‘औरों में कौन दम था’, ‘रेड 2’ आणि ‘सिंघम अगेन’ या तिन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या अजय देवगण त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वेल त्याच्या जमाखर्चात आहे. अशात आता सिंघम अगेन चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे. अजय देवगणचा सिंघम अगेन हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. त्याच वेळी अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 देखील रिलीज होणार होता. पण कॉप युनिव्हर्सच्या लोकांनी ते पुढे ढकलले. सगळ्यांना वाटलं होतं की यामागचं कारण अल्लू अर्जुन आहे. पण निर्मात्यांनी सांगितले की त्यांना कशाचीही घाई करायची नाही. चित्रपटाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे चित्रपट पुढे नेण्यात येत आहे. आता हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया ३ या चित्रपटाशी होणार आहे. रिलीजपूर्वीच क्लायमॅक्सचा सीन लीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अजय देवगणचा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून बराच अवधी आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायक झाला आहे. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन रिलीजपूर्वीच लीक झाला. मात्र या लीक झालेल्या सीन बाबत सिंघम अगेनच्या टीम कडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.