Ajay Devgan: 90 च्या दशकात खानची चलती होती. सलमान, शाहरुख आणि आमिर या कलाकारांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या कलाकारांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर अनेकांचे लक्ष त्याकडे असायचं. दरम्यानच्या काळात अनेक कलाकारांनी आपल्या वेगळ्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातलं एक नाव म्हणजे अजय देवगण. अभिनेता अजय देवगणने अनेक सिनेमे केले. काही फ्लॅाट ठरले तर काही हिट. पण त्याच्या प्रत्येक सिनेमांमध्ये अजयचा औरा म्हणजे नादच… बॉलीवूडमध्ये अजय देवगणने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी अशा जॅानर्रमधील त्याचे सिनेमे प्रेक्षकांना आपलेसे वाटत गेले आणि बघता बघता अजय देवगण इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत जाऊन बसला. पण तुम्हाला हे माहितीये का सलग 10 सिनेमे अजयचे फ्लॅाप ठरले होते. त्या कठीण काळात एका मोठ्या सिनेमात काम करण्यासाठी तो खूप तरसला होता. इश्क सिनेमातील एक दृश्य त्याचा हा काळा काळ त्या एका सिनेमाने बदलून टाकला. अभिनेता अजय देवगणने ‘फुल और कांटे ‘ या सिनेमातून बॅालिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील त्याची पहिलीच छाप प्रेक्षकांना थक्क करणारी ठरली. पहिलाच सिनेमा यशस्वी झाल्याने त्याला अनेक ऑफर्स आल्या. सुरुवातीचे काही सिनेमे चांगले चालले. 1994 ते 1997 दरम्यान अजयने अंदाजे दहा सिनेमे केले. जे सगळे एका मागोमाग एक फ्लॉप ठरले. या सिनेमाने तारलं सलग तीन वर्ष एका हिटच्या शोधात असलेल्या अजय देवगणला इश्क या सिनेमाने तारलं. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने पुन्हा एकदा दमदार कमबॅक अजय देवगणला करुन दिलं. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. तब्बल 24.93 कोटी रुपयांची जादूई कमाई इश्कने त्यावेळी केली होती. हेही वाचा : Abhishek Bachchan on Marriage: “पत्नीने स्वतःची स्वप्नं थांबवू नयेत!”…अभिषेक बच्चनचे लग्न आणि पालकत्वावर स्पष्ट मत