नगर । व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवी प्रयत्न – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे

नगर – माजी महसूल मंत्र्याकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. आज पहिल्यांदा पारदर्शकपणे नियुक्त आणि अधिकाऱ्यांना बढती मिळाल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो. याचे भान ठेवले पाहिजे. तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करत व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला. पण सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती इतक्या पारदर्शक पद्धतीने पार पडली.
त्यामुळे माजी महसूल मंत्र्यांना आव्हान आहे, की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.
अहमदनगर शहरातील सहकार सभागृहात महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते.
यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह नवीन नियुक्त तलाठी, पदाकारी उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूल मंत्री आणि एक विद्यामान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माजी महसूल मंत्र्याकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. आज पहिल्यांदा पारदर्शकपणे नियुक्त आणि अधिकाऱ्यांना बढती मिळाल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो. याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
तसेच नगर शहराच्या विकासाठी पायाभूत सुविधा करता ह्या गोष्टी आवश्यक आहे. जिल्ह्यातील पहिला उड्डान पूल नगर शहरात उभा केला. तत्काली खासदार् सुजय विखे यांच्या प्रययत्नाने हा पूल झाला. नगर शहरात तीन पुलाची आमची कमेंन्टेमेंट आमची होती. ती आज भूमिपूजनाने आम्ही केली आहे. नगर शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
दिव्यांग बनावट प्रमाणपत्राची होणार चौकशी
जिल्ह्या रुग्णालयात दिव्यांगाची बनावट प्रमाण पत्र आढळून आले आहेत. त्याचे गुन्हे दाखल होत नाही. असे विचारले असता मंत्री विखे म्हणाले, बनावट दिव्यांग प्रमाण पत्राबाबत मोठे प्रकरण पुढे आले आहे. सरकार त्याची चौकशी करत आहेत. जे जे बोगस प्रमाणपत्र दिले असतील किंवा आढळून येतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे.





