कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘यु टर्न’ म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराज अन् संगोली रायन्ना हे दोन्ही आपले आदर्श’

बेळगाव – कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत.
Shivaji Maharaj & Sangolli Rayanna, both are freedom fighters&our idols. I respect & follow them. Some anti-social elements trying to create disturbance & trying to divide people in terms of language& other things: Karnataka CM Basavaraja Bommai on the desecration of statues pic.twitter.com/8r3Rr9YJR1
— ANI (@ANI) December 18, 2021
या घटनेवरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केल आहे. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.
राज्यभरातून या घटनेचा आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हा अनादर खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. आता, बोम्मई यांनी आपल्या विधानावरुन युटर्न घेतला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोली रायन्ना हे दोन्ही स्वातंत्र्य सैनिक आणि आपले आदर्श आहेत. मी दोन्ही महापुरुषांचा आदर करतो अन् त्यांचे अनुकरण करतो. मात्र, काही समाजकंटकांडून भाषेच्या आधारावरुन समाजात तेढ निर्माण करण्याचं आणि तणावाचं वातावरण करण्यात येत आहे. तसेच, या घटनेसंबंधित कर्नाटकात आत्तापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आल्याचंही बोम्मई यांनी सांगितलं.
दरम्यान, विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.





