Devendra Fadnavis : खासदारांना मुख्यमंत्र्यांनी तो एक शब्द दिला; अॅापरेशन टायगरमध्ये महत्वाची भूमिका, धक्कादायक खुलासाही समोर
Devendra Fadnavis : आता अॅापरेशन टायगरविषयी एक मोठी माहिती आणि महत्वाचा खुलासा समोर आला आहे.

Devendra Fadnavis : सारं काही सुरूळीत सुरू असताना सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची यांची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. गेल्या अनेक दिवसांपासून अॅापरेशन टायगरची चर्चा होती ते यशस्वी करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं. मात्र, आता अॅापरेशन टायगरविषयी एक मोठी माहिती आणि महत्वाचा खुलासा समोर आला आहे.
या संपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच ही मोहीम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
अॅापरेशन टायगरला ब्रेक लागल्याची चर्चा पण…
खरंतर गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नव्हते. एका बाजूला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळत नव्हता, तर दुसऱ्या बाजूला खासदारांनाही पक्षांतरानंतरामुळे राजकीय भवितव्याबाबत संभ्रम होता. यामुळे अॅापरेशन टायगरला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खासदारांना हमी मिळल्यानंतर अॅापरेशन टायगर यशस्वी झालं.
फडणवीसांनी दिला शब्द त्यानंतर….
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटातील काही खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला या खासदारांना भाजपमध्ये घ्यायचे की शिंदे यांच्या शिवसेनेत, याबाबतही संभ्रम असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित खासदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विश्वास दिला. आगामी निवडणुकांमध्ये त्यांचे हित जपले जाईल, अशी हमी मिळाल्यानंतरच खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा मोठा निर्णय घेतला.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी केलेले एक सूचक वक्तव्यही चर्चेचा विषय ठरले होते. “ऑपरेशन यशस्वी झाले आणि रुग्ण सुखरूप आहे,” असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळीच या संपूर्ण मोहिमेत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संकेत मिळाले होते.
दरम्यान, जानेवारी २०२६ नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘ऑपरेशन टायगर’कडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर हळूहळू मोठ्या राजकीय हालचाली झाल्या. अखेर ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर केले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ नंतर मोठा राजकीय भूंकप झाला.
अॅापरेशन टायगरबाबत धक्कादायक खुलासा
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन टायगरमधील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बंडखोर खासदारांची पहिली पसंती शिंदे सेना नव्हती. तर भाजप होती. त्यांना धनुष्यबाण नव्हे तर कमळ हाती घ्यायचे होते. असा दावा सूत्रांनी दिलेल्या माहितीत करण्यात आला आहे. मात्र, खासदारांना शिंदे सेनेतच प्रवेश देण्यात यावा अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका होती. याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत फडणवीस यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर ऑपरेशर टायगरला आणि खासदारांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाला हिरवा झेंडा मिळाला.






