LPG Gas Cylinder : “केंद्राचे धोरण शून्य, केवळ घोषणाबाजी…”; वाढलेल्या एलपीजी दरावरून राहुल गांधींचा PM मोदींवर प्रहार
हे सरकार केवळ मोठ्या घोषणांवर चालते, परंतु प्रत्यक्षात त्यामागे कोणतेही ठोस धोरण नसते, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक बोजा पुन्हा एकदा गरिबांवर पडला आहे.

हे सरकार केवळ मोठ्या घोषणांवर चालते, परंतु प्रत्यक्षात त्यामागे कोणतेही ठोस धोरण नसते, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक बोजा पुन्हा एकदा गरिबांवर पडला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी एलपीजी संकटाचा सामना करण्यासाठी कोविड काळाप्रमाणे सज्ज राहण्याचे आवाहन केले होते, आणि दुर्दैवाने त्यांनी तसेच केले. कोविड काळात ज्याप्रमाणे धोरणशून्य नियोजनामुळे सामान्य जनतेचे हाल झाले, तसेच आता गॅस संकटाबाबत घडत आहे. LPG Gas Cylinder

LPG Gas Cylinder : “केंद्राचे धोरण शून्य, केवळ घोषणाबाजी…”; वाढलेल्या एलपीजी दरावरून राहुल गांधींचा PM मोदींवर प्रहार
दररोज ५०० ते ८०० रुपये कमवणाऱ्या मजुराच्या आवाक्याबाहेर आता घरगुती गॅस गेला असून, रात्री घरी परतल्यावर चूल पेटवण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत, अशी भीषण परिस्थिती त्यांनी मांडली. LPG Gas Cylinder
खासदार राहुल गांधी यांनी असाही दावा केला की, सरकारच्या राजनैतिक चुकांमुळे हे संकट ओढवले आहे. कापड उद्योग आधीच आयसीयूमध्ये आहे आणि उत्पादन क्षेत्र श्वास घेण्यासाठी धडपडत आहे. जेव्हा अहंकार हेच धोरण बनते, तेव्हा अर्थव्यवस्था कोलमडते आणि देश अनेक दशके मागे जातो, अशी टीका त्यांनी केली. LPG Gas Cylinder
मजुरांना पुन्हा एकदा शहरातून गावाकडे स्थलांतर करावे लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येक संकटात नेहमी गरिबाचाच बळी का जातो? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी यांनी जनतेला या अन्यायाविरुद्ध गप्प न बसण्याचे आवाहन केले आहे. LPG Gas Cylinder





