Pune Crime | सोशल मिडियातील मित्राने केला बलात्कार; 5 लाख रुपये न दिल्याने फोटो व्हायरल, चौघांवर गुन्हा

दिल्ली येथून आणलेल्या मिठाईतून दिले गुंगीचे

पुणे,दि. 6 – सोशल मिडियातील दोस्तीतून एका महाविद्यालयीन तरुणीवर शारीरीक अत्याचार करण्यात आले. तीच्याकडील सोन्याचे दागिने व एक लाखाची रोकड घेण्यात आली. यानंतर आणखी पाच लाखाच्या रकमेसाठी तीला धमकावण्यात आले. तीने पैसे देण्यास नकार दिल्यावर तीची अश्‍लिल छायाचित्र तीचा मित्र व भावाच्या मोबाईलवर पाठवण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दिल्ली येथे रहाणाऱ्या दोन महिलांसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल जयपाल चिल्लर (28), पुजा सिंग(25), समीर चौधरी(27), ज्योती (21, सर्व रा.हस्तल दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खराडीत पेईंग गेस्ट म्हणून रहाणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हीची सोशल मिडियावर पुजा सिंग बरोबर ओळख झाली होती. तीने आरोपी विशाल चिल्लर याच्याबरोबर फिर्यादीची ओळख करुन दिली. यामुळे फिर्यादरी व विशालमध्ये फोनवरुन नेहमी बोलने होते होते. दरम्यान विशाल नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादीला भेटण्यासाठी पुणे येथे आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस तुझ्यासाठी दिल्ली येथुन मिठाई आणलेली आहे. सदरची मिठाई लॉजवर ठेवलेली आहे, सदरची मिठाई घरी घेऊन जा असे सांगीतले. यानंतर फिर्यादीला फ्लॅगशिप, तुळजाभवानी नगर, खराडी येथील लॉजवर घेऊन जावून दिल्ली येथुन आणलेली मिठाई खायला दिली.

यामध्ये गुंगीकार पदार्थ घालुन सदरची मिठाई फिर्यादीला सतत जबरदस्तीने खाण्यास दिली. फिर्यादीला गुंगी आलेने त्याने तीचे संमतीशिवाय जबरदस्तीने शरीर सबंध ठेवले. त्यानंतर देखील त्याने त्याचा यापुर्वी विवाह झाला असताना देखील त्याने मला तु फार आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगुन तीला गोवा येथे फिरण्यास घेऊन जाऊन तेथे देखील वेळोवेळी फिचे संमती शिवाय जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तसेच तीच्याकडून एक लाख रक्कम खर्चासाठी घेऊन सदरची रक्कम परत दिली नाही. फिर्यादी दिल्ली येथे गेली असताना आरोपीने फिचे अंगावरील साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढुन घेतले.

त्याचेसोबत ती दिल्ली येथे असताना ज्योती ही फिर्यादीला सतत जेवणात गुंगीचे औषध घालून देत होते. आरोपी विशाल याने एके दवशी फिर्यादी रहात असलेले रुमवर येऊन तीचा हात पकडुन तु मला फार आवडतेस असे बोलुन तीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुजा सिंग ही फिर्यादीला वांरवार विशाल याचेसोबत संबंध ठेवण्यास सांगत होती.

यानंतर विशाल व पुजा यांनी तीला तुझे काढलेले अश्‍लिल फोटो मित्र व नातेवाइकांना व्हायरल करण्याची धमकी दिली तीच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र तीने ते न दिल्याने व तुमचे विरुध्द पोलीसात तक्रार करणार आहे असे सांगितले असता पुजा हिने सदरचे अश्‍लिल फोटो फिर्यादीचा मित्र अजय पाटील तसेच भाऊ संजय बाहेती यांचे मोबाईल फोनवर पाठवून बदनामी केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक थोपटे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.