लोकांनी रस्त्यावर येत मशाली पेटवणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस- उपमुख्यमंत्री
Updated On:

मुंबई : कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी घरातील वीज बंद करून दिवा, मेणबत्ती मोबाईल टॉर्चचा फ्लॅशलाईट ९ मिनिटासाठी लावावा असे अवाहन होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
मात्र काही लोकांनाही रत्स्यावर उतरत मशाली आणि फटाके फोडून कायद्याचे उल्लंघन केले आहे.
त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही काही लोकांनी रस्त्यावर येत अशी कृत्य करणं म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस असल्याचे ते म्हणाले.




