नगर | जिल्ह्यात कायदासुव्यवस्थेचा उडाला बोजवारा

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एकाच दिवशी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत व्यापार्यावर जिवे घेणा हल्ला होतो. तर दुसरी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत एकावर चाकू हल्ला होतो. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात टवाळखोर्यांकडून पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले जात असून खाकीचा धाक कमी होत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभिर्याने पहाण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनी मध्ये दोन अज्ञात व्यक्तीनीं बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडून आले आहे. मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळले नसून तोफखाना पोलीस ठाण्यात अद्न्यात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत मतिन् शेख यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व्यापार्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. ते त्यांचा शोध घेतील ही. मात्र, जिल्ह्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णता बोजवारा उडला आहे.
या पूर्वी शहराता ताबेमारी, खंडणी, अपासातील वादातून खूनाच्या घटना घडल्या आहेत. राहुरी येथील वकील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ ताब्यात घेतले. मात्र, ओपींना कठोर व्हावी, यासाठी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कायद्याचा धाक काय असतो तो टवाळखोरांना दाखवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.




