माळेगाव (बारामती): बारामती तालुक्यातील माळेगाव येथील आबा तुकाराम काळे या विटभट्टी चालकाच्या मुलाची पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
आबा काळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिवनगर, तर शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर येथे माध्यमिक शिक्षण, तसेच महाविद्यालयीन शिक्षण हे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरींग कॉलेज येथे झाले.
त्यांची शासनाच्या सरळसेवा परिक्षा उत्तीर्ण होऊन पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदी निवड झाली आहे. त्यांचे वडील तुकाराम शंकर काळे हे विट भट्टी चालक आहे. तर दोन भाऊ किशोर व सुनील काळे हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय करतात.
‘जिद्द, चिकाटी व कष्टाने प्रयत्न करुन हे यश मिळाले आहे. माझ्या यशात कुटुंबातील सर्वांचा वाटा असुन प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतेही यश अवघड नाही.’ – आबा काळे (यशस्वी अभियंता)
‘मला शिक्षणाचे महत्व माहिती असल्याने माझ्या चारही मुलांना उच्च शिक्षण दिले असून माझ्या मुलाने मिळवलेल्या यशामुळे माझ्या कष्टाचे चीज झाले.’ – तुकाराम शंकरराव काळे (आबा काळे यांचे वडील)