Oscar Award 2025 : बॅाक्स अॅाफिसवर चालले नाहीत, पण अॅास्करच्या यादीत स्थान ; ‘हे’ आहेत ते पाच सिनेमे

जगातील सिने इंडस्ट्रमधील सर्वात मोठा पुरस्कार म्हणून अॅास्करकडे पाहिले जाते. अकॅडमी अॅाफ मोशन पिक्चर आर्ट्स अँन्ड सायन्सेसने अॅाक्सर २०२५ मध्ये शॅार्टलिस्ट केलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तब्बल २३२ शॅार्टलिस्ट केलेल्या सिनेमांचा समावेश आहे. यामध्ये ५ भारतीय सिनेमे शॅार्टलिस्ट करण्यात आले आहे. २३२ पैकी २०७ सिनेमे हे सर्वात्कृष्ट सिनेमाच्या श्रेणीमध्ये निवडले गेले आहेत. या निवडलेल्या २३२ सिनेमांसाठी मतदान प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १२ जानेवारीपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यानंतर १७ जानेवारी रोजी यामधील अंतिम सिनेमांची यादी अॅकॅडमी मोशन पिक्चर प्रसिद्ध करणार असून त्याच सिनेमांना अॅाक्सर वारी करण्याची संधी मिळणार आहे.
पण यातील काही असे सिनेमे आहेत की जे तिकीट खिडकीवर फार काळ टिकू शकले नाहीत. त्या बद्दल जाणून घेणार आहोत…
कंगुवा बॅाक्स अॅाफिसवर फेल पण अॅाक्सरच्या स्पर्धेत
दक्षिणात्य अभिनेता सूर्या याची मुख्य भूमिका असलेला कंगुवा सिनेमाने प्रेक्षकांना निराश केलं. हा सिनेमा फारशी कमाल बॅाक्स अॅाफिसवर दाखवू शकला नाही. ३०० कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने केवळ १०० कोटींचा गल्ला मिळवला. असे असले तरी कंगुवा सिनेमा अॅाक्सरच्या यादीत दाखल झाला आहे.
अंतिम यादीतून लापता लडीज लापता
किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या लापता लेडीज सिनेमाची खूप चर्चा झाली. सिनेमाला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. अॅास्करच्या पहिल्या यादीत या सिनेमाचे नाव होते, पण अॅाक्सरच्या अंतिम यादीतून या सिनेमाला वगळण्यात आले आहे. यामुळे लापता लेडीज अॅाक्सरच्या लिस्टमधून बाहेर पडला आहे.
स्वातंत्रवीर सावरकर सिनेमाही शर्यतीत
अभिनेता रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर अॅाक्सरच्या शर्यतीत आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्रवीर सावरकर सिनेमा अॅाक्सरच्या शर्यतीत आहे.
ऑल वी इमॅजिन ॲज लाइटही शर्यतीत
पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या सिनेमाला गोल्डन ग्लोब्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (इंग्रजी नसलेल्या) श्रेणीत पारितोषिक मिळाले. आता हा सिनेमा ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. यापूर्वी या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता.
या दिवशी होणार पुरस्कारचे वितरण
२ मार्च रोजी ९७ वा अॅास्कर पुरस्कार होणार आहे. यंदाही लॅास एंजेलिसमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिलियन मर्फीच्या ओपनहाइमर या सिनेमाने गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कारासह ७ पुरस्कार जिंकले होते.





