Nana Patekar: पडद्यावरचा रुबाबदार नायक अन् कॅमेऱ्यामागे एक उत्तम ‘शेफ’; नाना पाटेकरांना होती स्वयंपाकाची प्रचंड आवड
Nana Patekar:

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील घरी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली असून, देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
नाना पाटेकर यांना आपण पडद्यावर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिले आहे. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नानांची जीवनशैली खूप साधी होती. चित्रपटसृष्टीतील झगमगत्या ग्लॅमरपासून दूर राहत त्यांनी नेहमीच साधेपणा जपला. नानांना बद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाले तर, त्यांना स्वयंपाक बनवण्याचाही खूप छंद होता.
ते एक उत्तम कूक होते आणि आपल्या मित्रांसाठी तसेच कुटुंबासाठी स्वयंपाक करणे त्यांना खूप आवडायचे.आपल्या मित्रांसाठी आणि पाहुण्यांसाठी स्वतः स्वयंपाक करणे त्यांना खूप आवडायचे. विशेषतः पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ, मटन आणि सी-फूड ते अत्यंत चविष्ट बनवायचे. तयार मसाल्यांऐवजी ते पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या ताज्या मसाल्यांचा वापर करायचे.
शूटिंगदरम्यानही ते संपूर्ण युनिटसाठी स्वतः जेवण बनवून घेऊन जायचे. त्यांनी ते सेटवरच्या किचनमध्ये स्वतःच्या हाताने चित्रपटाच्या टीमसाठी माशांची डिश बनवली होती. ही खास रेसिपी त्यांना त्यांच्या आईकडून शिकली होती. हा किस्सा त्यावेळचा आहे, जेव्हा नाना पाटेकर ‘मालामाल वीकली’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान त्यांनी टीमसाठी स्वतः स्वयंपाक केला होता. नानांनी स्वतःच्या हाताने माशांची एक खास डिश तयार केली. सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांना ही डिश आवडली आणि त्यांचे कौतुकही केले.
आईकडून शिकले होते स्वयंपाक
नाना पाटेकर यांच्यासाठी कुकिंग हा फक्त एक छंद नव्हता, तर त्याचा संबंध त्यांच्या आईशी जोडलेला होता. त्यांनी सांगितले होते की, लहानपणी जेव्हा त्यांची आई स्वयंपाक करायची, तेव्हा ते तिच्या आसपासच असायचे आणि गोष्टी बारकाईने पाहायचे. हळूहळू त्यांनी आईकडूनच स्वयंपाक करण्याची पद्धत शिकून घेतली.
नानांना बाहेर जाऊन जेवणे फारसे आवडत नव्हते. खूप गरज असेल तरच ते बाहेरचे जेवायचे. अगदी घरात २५ लोकांची पार्टी असेल, तरीही बाहेरून जेवण मागवण्याऐवजी ते स्वतः स्वयंपाक करणे पसंत करायचे. ज्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
याशिवाय ते स्वत: शेती करायचे, गायी आणि बैलांची देखभाल करायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास त्यांना आवडत असे. आजच्या काळात जिथे लोक सोशल मीडिया आणि कॅमेऱ्यासमोर आपली जीवनशैली सर्वोत्तम दाखवण्याच्या प्रयत्नात असतात, तिथे नाना पाटेकर नेहमीच अत्यंत स्पष्ट आणि बिनधास्त राहिले.
हेही वाचा:





