Ayushmann Khurrana : बॉलिवूडमध्ये बिश्नोई गँगची दहशत.! अभिनेता आयुषमान खुराणाला धमकी; कोट्यवधींच्या खंडणीची मागणी
गोळीबाराच्या घटना, धमकीचे फोन आणि कोट्यवधी रुपयांच्या खंडणीच्या मागण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Ayushmann Khurrana : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेमागे आता भीतीचं सावट गडद होताना दिसत आहे. एकीकडे चित्रपटांचे शूटिंग, प्रमोशन आणि सेलिब्रिटींच्या पार्ट्यांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोळीबाराच्या घटना, धमकीचे फोन आणि कोट्यवधी रुपयांच्या खंडणीच्या मागण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. (Ayushmann Khurrana )

Ayushmann Khurrana : बॉलिवूडमध्ये बिश्नोई गँगची दहशत.! अभिनेता आयुषमान खुराणाला धमकी; कोट्यवधींच्या खंडणीची मागणी
अभिनेता सलमान खानपासून ते रणवीर सिंहपर्यंत अनेक सेलिब्रिटींना यापूर्वी धमक्यांचा सामना करावा लागला आहे. आता अभिनेता आयुषमान खुराणाही या धमकीसत्राच्या निशाण्यावर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने आयुषमानला धमकीचा ऑडिओ संदेश पाठवत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे वृत्त आहे. (Ayushmann Khurrana)
विशेष म्हणजे, याच्या अवघ्या काही दिवस आधी अभिनेता तुषार कपूरलाही पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांना लक्ष्य करणारे हे धमकीसत्र नेमके कोण चालवत आहे आणि त्यामागे खरोखरच कुख्यात टोळीचा हात आहे की तिच्या नावाचा गैरवापर केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Ayushmann Khurrana)
आयुषमान खुराणाला नेमकी काय धमकी मिळाली? (Ayushmann Khurrana)
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषमान खुराणाला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ऑडिओ संदेश प्राप्त झाला आहे. या संदेशात संबंधित व्यक्तीने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचे सांगितले आणि अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून सध्या संबंधित ऑडिओ संदेशाची सत्यता पडताळली जात आहे. संदेशातील आवाजाची तुलना पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध असलेल्या संशयित व्यक्तीच्या आवाजाच्या नमुन्याशी केली जात आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे, धमकीचा संदेश कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने बिश्नोई गँगचे नाव घेतले असले तरी त्याचा या टोळीशी प्रत्यक्ष संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही धमकी खरोखरच गँगशी संबंधित व्यक्तीकडून आली आहे की खंडणी उकळण्यासाठी कोणीतरी टोळीच्या नावाचा वापर करत आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती.





