Ranbir Kapoor : बाबासोबत लेकही दिसणार; रामायणामधून होणार राहाचा डेब्यू, स्वत: रणबीरने दिली माहिती
Ranbir Kapoor : राहाने साई पल्लवी आणि रवी दुबे यांच्यासोबत एका शॉटमध्ये भाग घेतला होता, असे रणबीरने सांगितले. याचाच अर्थ असा की या भव्य चित्रपटात रणबीरसोबत त्याच्या लहान मुलीची एक झलक पाहायला मिळणार आहे.

Ranbir Kapoor : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा महत्वकांशी ‘रामायण: पार्ट वन’ हा चित्रपट दिवाळीच्या शुभमूर्तावर प्रदर्शित होत आहे. या बहुचर्चेत चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अभिनेता रणबीर कपूरने एक महत्वाचे गुपित उघड केले आहे.
रणबीर आणि आलिया यांची मुलगी राहा ही देखील रामायणाचा भाग असणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने याविषयीची माहिती उघड केली. त्याने राहाचा नेमका रोल काय असणार हे देखील सांगितले. राहा या चित्रपटात एका कॅमिओ रोलमध्ये झळकणार आहे. या घोषषेमुळे आता चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
राहाने साई पल्लवी आणि रवी दुबे यांच्यासोबत एका शॉटमध्ये भाग घेतला होता, असे रणबीरने सांगितले. याचाच अर्थ असा की या भव्य चित्रपटात रणबीरसोबत त्याच्या लहान मुलीची एक झलक पाहायला मिळणार आहे.
रणबीर म्हणाला “राहा ६ नोव्हेंबरला आपला चौथा वाढदिवस साजरा करणार आहे. विशेष म्हणजे, ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये आणि राहाच्या वाढदिवसामध्ये फक्त एका दिवसाचे अंतर आहे.”
‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या दोन्ही भागांचे एकूण बजेट सुमारे ४,००० कोटी रुपये आहे. या अधात्मिक चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगला मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.





