Ram Sutar passed away | ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्यावर्षी निधन झाले आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. . काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होतील. काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. देशभरात राम सुतार यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश आहे. कारकिर्दीच्या गेल्या 60 वर्षांत त्यांनी 200हून अधिक भव्य शिल्प तयार केलीत. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचेही शिल्प राम सुतार यांनी तयार केलेत. त्यांनी आपल्या हातानं विदेशातील महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडविले आहेत. संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषणातील पुतळाही त्यांनी घडविला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे जगभरात भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीके म्हणून उभे राहिलेले आहेत. नोएडा येथील राम सुतार यांचा स्टुडिओ संग्रहालयासारखा भव्य आहे. Ram Sutar passed away | तिथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भव्य प्रतिकृती तसेच अनेक मॉडेल्स मोठ्या संख्येनं आहेत. त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी वडिलांच्या कलाकृती एकत्र प्रदर्शित करून ‘आनंदवन’ नावाचं एक विस्तीर्ण शिल्प उद्यान विकसित केलं आहे. अनिल सुतार हे देखील एक प्रसिद्ध मूर्तिकार आहे. राम सुतार यांचा जीवन परिचय ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी बईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला. Ram Sutar passed away | राम सुतार यांनी आत्तापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यांचे पुनर्जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 1950 मध्ये महत्त्वाचं काम करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मॉडेलर म्हणून अनेक शिल्पांना गतवैभव मिळवून देण्यासाठी काम केलं. 1959 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय, प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र, शिल्पकलेची जास्त आवड असल्यानं त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्र करियर निवडणं पसंत केलं. राम सुतार यांनी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रसिद्ध पुतळ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ द्वारे स्वतःला महान शिल्पकारांच्या श्रेणीत समाविष्ट केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, जो 182 मीटर (597 फूट) उंच आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी केले. हे स्मारक सरदार सरोवर धरणापासून 3.2 किमी अंतरावर बांधले आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार करण्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा अनिल सुतार आणि इतर सहकाऱ्यांकडून दिवसरात्र सहकार्य मिळाले. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. Ram Sutar passed away | हेही वाचा: PMC Election: भाजपमध्ये ‘आयात’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ संघर्ष पेटला; सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची मोहीम सुरू