Vijay Wadettiwar : १० राज्यातील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ राज्यसभेचे खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यापैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेवरून आघाडीतील तिन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला असून, तिन्ही पक्षांकडून राज्यसभेच्या एका जागेवर दावा केला जात आहे. १६ मार्च रोजी ही निवडणूक होणार असून, ५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने रंगत वाढली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच ३ मार्चला म्हणजेच काल खासदार सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या. या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून अजून निर्णय अंतिम झाला नसल्याचे स्पष्ट केले. या सगळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. राज्यसभेच्या जागेसंदर्भात बोलताना वडट्टेवार म्हणाले, “आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला मिळावी. विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी.” वडेट्टीवार यांनी या जागेसंदर्भात उमेदवाराचे नाव निश्चित केलेले नाही. अंतिम निर्णय हा महाविकाच्या आघाडीच्या बैठकीत होईल, असे स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आघाडीचे तिन्ही पक्षापैकी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरला जाणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. खासदार सुप्रिया सुळे काल ३ मार्चला मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेच्या जागेविषयी चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यावर वडेट्टीवार म्हणाले, “सुप्रिया सुळे काय म्हणत आहेत, ते उद्धव ठाकरे यांना भेटून काय बोलल्या, हे मला माहित नाही. आम्हाला अजूनही दिल्लीवरून काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कुठल्याही सूचना आलेल्या नाही.” राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी त्या पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान १०% जागा (म्हणजेच २५ सदस्य) असणे बंधनकारक आहे. सध्या काँग्रेसकडे २७ सदस्य आहेत. मात्र, यावर्षी होणाऱ्या ७२ जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ २५ च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या : 245 विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक (१०%) : २५ काँग्रेसचे संख्याबळ : २७ हेही वाचा : Pune News : सुप्रसिध्द सायबर एक्सपर्ट नचिकेत दांडेकर यांचे टपाल तिकीट